सुमित्र माडगूळकर | Sumitr Madgulkar | Sumitra Madgulkar


"श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर यांचा थोडक्यात परिचय"

Sumitr Madgulkar | Sumitra Madgulkar Gadima & Sumitr Madgulkar Sumitr Madgulkar | Sumitra Madgulkar Sumitr Madgulkar | Sumitra Madgulkar

१) गदिमांचे नातू व लेखक आहेत,व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीयर तथा सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट आहेत,१९९८ साली गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित इंटरनेटवर ''मराठी साहित्यातील'' पहिली Multimedia वेबसाईट गदिमा.कॉम (gadima.com ) त्यांनी तयार केलेली आहे.मराठी भाषा इंटरनेटवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

२) दै.लोकमत,दै.देशोन्नती सारख्या अनेक लोकप्रिय मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्ति व अनेक मराठी वेबसाईटना त्यांनी तंत्रज्ञान सहाय्य दिलेले आहे.

३) पुण्यातील "वसंत व्याखानमाला",पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चा "पुलोत्सव",महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय या सारख्या मान्यवर संस्थांमध्ये त्यांनी गदिमांच्या गाणी व आठवणींवर "तो राजहंस एक","गदिमान्य " सारखे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.

४) दूरदर्शन,ई टिव्ही मराठी,झी मराठी,News18 लोकमत,स्टार माझा सारख्या अनेक वाहिन्यांवर मराठी बातम्या,मानाचा मुजरा,नक्षत्राचे देणे अशा कार्यक्रमात सहभाग.सोनी म्युझिक च्या सहकार्याने 'जोगिया' या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती त्यांनी केली होती.सकाळ,लोकमत,महाराष्ट्र टाईम्स सारख्या अनेक वृत्तपत्रातून तसेच लोकप्रिय दिवाळी अंकातून व सोशल मीडियातून त्यांचे लिखाण चालू असते.

५) अँड्रॉइड (Android) मोबाईलवर ''गीतरामायण अ‍ॅप'' चे निर्माते,फेसबुकवर गदिमा व गीतरामायण पेज ची निर्मिती,तसेच आठवणीतील गाणी,झगमग.नेट सारख्या वेबसाईटवरुन त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे.

६) ''गदिमा साहित्य कला अकादमी'' या संस्थेच्या माध्यमातून गदिमांचे स्मारक ते पुण्यात उभारत आहेत व त्यांचे साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी इंटरनेट,पेनड्राईव्ह,डिव्हीडी सारख्या माध्यमातून त्यांनी गदिमांचे साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे.

सुमित्र माडगूळकर फेसबुक पान | Sumitr Madgulkar Facebook Page : https://www.facebook.com/sumitr.madgulkar/


Visit Gadima Website